पत्रकार विश्वांबर बसवंते यांची कन्या कु.शिवकन्या ने घेतले दहावी परीक्षेत ८८.६०% गुण

पत्रकार  विश्वांबर बसवंते यांची कन्या कु.शिवकन्या ने घेतले दहावी परीक्षेत   ८८.६०% गुण 


कंधारः- (डॉ.माधव कुद्रे)

      नुकताच एस.एस.सी.बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कंधार तालुक्यातील फुलवळ येथील पत्रकार  विश्वांभर बसवंते यांची कन्या श्री बसवेश्वर विद्यालयाची कु.शिवकन्या विश्वांभर बसवंते हीने ८८.६०% गुण मिळवून शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.  तिच्या या यशाबद्धल तिच्यावर गावातील व परिसरातील आप्तेष्टांकडून अभिनंदचा वर्षाव होत आहे.        श्री बसवेश्वर विद्यालयाचा १० वीचा निकाल ८५.९६ % एवढा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक व गुरुजनांत आनंदाचे वातावरण निर्माण होऊन समाधान व्यक्त केले जात आहे. शाळेतून द्वितीय येण्याचा मान असिफ बिच्छु याने ८८.२०% गुण मिळवून घेतला असून सुमेध वाघमारे याने ८७.२०% गुण प्राप्त करून तिसरे स्थान पटकावले आहे.     सदर शाळेतून एस.एस.सी. बोर्ड परीक्षेसाठी एकूण ५७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८ विद्यार्थी अणुऊत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वैजनाथराव सादलापुरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी विश्वांभरराव मंगनाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसवेश्वर मंगनाळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.एम.पांडागळे, प्रभारी मुख्याध्यापक बी.एन.मंगनाळे, वर्गशिक्षक चंद्रकांत फुलवळकर, संपूर्ण शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *