बिलोली ;प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात दि.09/12/2020 रोजी मातंग समाजाच्या मुकबधीर मुलिवर बलात्कार करून निर्घृणपणे डोके व तोंड टेचून खून करण्यात आला आहे . हि घटना अतिशय निंदनीय असून मानुसकीला काळीमा फासणारी आहे.या प्रकरणाच्या संदर्भात लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.लहुश्री विष्णुभाऊ कसबे यांनी बिलोली येथे पिडीत कुटुंबियांना भेट दिली व तहसीलदार व पोलीस निरिक्षक डोईफोडे यांच्याशी चर्चा केली आहे.
सबंधित प्रकरणाची चौकशी करुन पिडीतांना न्याय मिळाला पाहीजे आणि सबंधित आरोपी ला दिशा कायद्याअंतर्गत फाशिची शिक्षा झाली पाहीजे अशि मागणी लाऊन धरली अन्यथा लवकरच नांदेड जिल्हासह राज्यभर तिव्र प्रकारात आंदोलण छेडण्यात येणार अशा इशाराही देण्यात आला.या प्रसंगी प्रदिपभाऊ वाघमारे ल.श.से जिल्हाध्यक्ष,संतोष सुर्यवंशी को.क.जिल्हाध्यक्ष,टि.के दाढेल यु.जिल्हाध्यक्ष.यमराज खरात. रविकांत पवळे कार्याध्यक्ष, माधव वाघमारे संघटक,संतोष दर्शने ता.अ.उमरी.संतोष गाडीवान ता.अ.देगलुर. गजानन वाघमारे ता.स.नांदेड,पञकार कुडके यांच्यसह समाजातील अनेक समाज बाधंव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.