बिलोली बलात्कार प्रकरणी आरोपीला फासीची शिक्षा देण्याची मामा मित्र मंडळाची मागणी

कंधार ; ता.प्र.

मामा मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बिलोली नांदेड जिल्हा येथील मातंग समाजातील सुनिता नबाजी कुडके या मूकबधिर मुलीवर दि.९ डिसेंबर रोजी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.

या बिलोली येथिल घटनास्थळी मारोती मामा गायकवाड मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांनी दि.10 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पिडीत कुटुंबाची सात्वन केले.

बिलोली येथिल तहसिल कार्यालयाचे तहसिलदार ,पोलीस निरीक्षक शिवाजीअण्णा डोईफोडे यांच्याशी संपर्क साधून या घटणेतील मुख्य आरोपी फरार असून संशयीत म्हणून एकास ताब्यात घेतले आहे.तर तात्काळ ख-या आरोपीस तात्काळ अटक करावे अशी मागणी केली.तसेच तहसिल प्रशासन वतिने तात्काळ एक लाखाची मदत पिडीत कुटूंबाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

तसेच बिलोली नगरपालीका प्रशासनाने नगरपालीकेत मयत कुटूबातील बहीणीस नौकरी मिळवून देण्याची मागणी केली.

पोलीस प्रशासनानानी तात्काळ ख-या आरोपीस आटक करुन फाशी देण्याची मागणी ही मामा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *