अरविंद मामांच्या आठवणीत भाचे गहिवरले ! हेंद्रे पाटील कुटुंबियांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाणांकडून सांत्वन



नांदेड, ; प्रतिनिधी

 माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे मेहुणे व माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे मामा अरविंद हेंद्रे पाटील यांच्या निधनानंतर  ना. अशोकराव चव्हाण यांनी  आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) येथे जाऊन हेंद्रे पाटील परिवाराचे सांत्वन केले.

 यावेळी अरविंद हेंद्रे पाटील यांच्या नियोजित समाधी स्थळाचे त्यांनी दर्शन घेतले. मामाच्या आठवणींनी त्यांना उमाळा दाटून आला.
आखाडा बाळापूरचे माजी सरपंच अरविंद हेंद्रे पाटील यांचे नुकतेच निधन झाले.  त्यांच्या निधनाबद्दल ना. अशोकराव चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. अशोकराव चव्हाण व माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण यांनी त्यांच्या नियोजित समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी आ. मोहनअण्णा हंबर्डे, महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, सभापती दत्ता बोंढारे, उपसभापती गोपू पाटील, जि.प.सदस्य भगवान खंदारे, नांदेड मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, प्रवक्ते संतोष पांडागळे, जकी कुरेशी, गुलाम कुरेशी, संदीप नरवाडे, प्रविण बायस यांची उपस्थिती होती.

हेंद्रे पाटील कुटुंबियांचे सांत्वन करतांना अरविंद हेंद्रे पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुमनबाई पाटील यांच्यासह या परिवारातील सुभाष हेंद्रे पाटील, मोहन हेंद्रे पाटील, सचिन हेंद्रे पाटील, संदीप विलासराव हेंद्रे पाटील, महेश विलासराव हेंद्रे पाटील, संतोष विलासराव हेंद्रे पाटील, प्रशांत विलासराव हेंद्रे पाटील, सुरेश विलासराव हेंद्रे पाटील, प्रकाश जाधव, दासराव हंबर्डे, मधुकरराव बोरसे, उमेश मोहिते आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *