डॉ. नामदेव राठोड यांची जनसंपर्क अधिकारी पदी निवड

डॉ. नामदेव राठोड यांची जनसंपर्क अधिकारी पदी निवड

जळकोट

     महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथपाल संघ महाराष्ट्र राज्य च्या  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कार्यक्षेत्रातील विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालय क्षेत्रातील प्राध्यापकाच्या अडी अडचनी व समस्या सोडवणूक आदी काम करणारी  मुक्ला विभागीय सेक्सनल कॉन्सिल संघटनेच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. नामदेव किशनराव राठोड याची निवड करण्यात आली आहे .दिनांक ३ एप्रिल २०२० च्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडीचे निर्णय घेऊन , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील नांदेड ,हिंगोली ,परभणी , आणि लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन ग्रंथालय  प्रमुखा द्वारे एकमताने केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ मोहन खेरडे संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र संत गाडगे बाबा विद्यापीठ ,अमरावती प्रा. डॉ. विनय पाटील (जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज असोसिएशन , जळगाव) , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे  संचालक ज्ञानस्त्रोत केंद्र तथा विभागीय अध्यक्ष  प्रा .डॉ.जगदीश कुलकर्णी मुक्ला चे विभागीय सचिव प्रा. राजेश गोरे यांनी डॉ.नामदेव राठोड यांची मुक्ला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परीक्षेत परिक्षेत्र नांदेड च्या जनसंपर्क अधिकारी पदी निवड केली आहे . यापूर्वी त्याने जुनी पेन्शन हक्क संघटना जळकोट , महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र ,स्वामुक्ला या परिषदेवर तसेच संभाजीराव केंद्रे महाविद्यालय प्राध्यापक संघटनेत यशस्वीपणे कार्य केले आहे .डॉ. राठोड यांचा हिंगोली , परभणी , नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील महाविद्यालय ग्रंथालय क्षेत्राशी फार मोठा जनसंपर्क असल्यामुळे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लॉयब्ररी  असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या विभागीय  कार्यक्षेत्राच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रथमताच जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाचे  ग्रंथपाल डॉ. नामदेव राठोड यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भागवत केंद्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी. लहाने महाराष्ट विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथपाल संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे ,जनरल सेक्रेटरी प्रा.डॉ. विनय पाटील ,जळगाव ,विभागीय अध्यक्ष डॉ. जगदीश कुलकर्णी विभागीय सचिव डॉ राजेश गोरे डॉ. उद्धव आघाव गंगाखेड ‘ डॉ. गोविदराव हबर्डे , डॉ. विलास काळे  पुर्णा, डॉ. राजेश पावडे औंढा नागनाथ , डॉ.पवार हिंगोली ,डॉ. रामदास टेकाळे परभणी ,डॉ. घनश्याम पांचाळ ,पालम , डॉ.राजेश घोगरे सोनखेड ,डॉ. सुधाकर टेकळे बिलोली , डॉ. सुग्रीव शिरसागर मुखेड , प्रा. अनिल जाधव देगलूर, प्रा सौ . मदाकिनी राठोड किनवट , प्रा.डॉ  चव्हाण  धर्माबाद , प्रा. गायकवाड संदिप , प्रा सुनिल राठोड , प्रा डॉ . कैलास वडजे, प्रा देशमुख शिवराज नांदेड ,डॉ. भारत लोकलवार नायगाव ,डॉ व्ही. व्ही. गिरी खिल्लारी , प्रा. किरण भिसे, प्रा जाधव विठ्ठल , डॉ. कटके महाविर ,डॉ विष्णू पवार , प्रा. अजित रंगदळ उदगीर आदीसह संभाजीराव केंद्रे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या निवडीबद्दल डॉक्टर राठोड यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *