महापुरुषांच्या स्मारकाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा -संभाजी ब्रिगेडची मागणी
कंधार ; सय्यद हबीब
संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यासाठी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माळेगाव यात्रा येथील पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा वर कठोर कारवाई करण्यात यावी. यापुढे सर्व महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सर्व महापुरुषांच्या स्मारकाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बाबत माननीय तहसीलदार सखाराम मांडवगडे व नगर परिषद कंधार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार , संभाजी ब्रिगेड मा.जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे व संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष कृष्णा गोटमवाड सुंदर सिंग जाधव गजानन चव्हाण. बहुजन सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम आन्ना चावरे ,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील बस्वदे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.