कंधार ; ता.प्र.
मंगलसांगी ता.कंधार या गावचे पहिले सरपंच तथा कंधार पंचायत समितीचे माजी उपसभापती मल्हारराव जळबाजी वाघमारे( वय ८५ वर्ष) हल्ली मुक्काम मल्हारनगर कंधार यांचे दिनांक ८ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने नांदेड येथे उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्यावर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आला.
मल्हाररावजी वाघमारे हे कै. शंकरराव चव्हाण यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून व मातंग समाजाची बुलंद तोफ म्हणून परीचित होते.ते सुमारे २५ वर्षे मंगलसांगवीचे पहीले सरपंच होते. तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात ६ मुले, २ मुली ,पत्नी ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.मातंग समाजातील एक सच्चा व निस्वार्थी कार्यकर्त्या गमावल्याबद्दल , निधनाबद्दल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शोक व्यक्त केला आहे.