कंधार ; दत्तात्रय एमेकर
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी , स्वातंत्र्यसेनानी भाई डॉ केशवराव धोंडगे यांनी वय 102 कंधार येथे कोविड लस कोविड लसीकरण घेतलेले राज्यात सर्वात जास्त वयाचे लोकप्रतिनिधी म्हणून भाई धोंडगे यांची ऐतिहासिक नोंद झाली आहे.
मन्याड खोर्यातील विद्रोही विचारवंत ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा.डाॅ.भाई केशवराव धोंडगे आणि केशवसखा,माजी आमदार व सभापती,स्वातंत्र्य सैनिक भाई गुरुनाथराव कुरुडे या वैचारिक मित्रत्व जपणारे खरे समाज सेवक यांनी दि.९ एप्रिल रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवाचार्या सौ.वाघमारे/भालेराव ताई यांच्या समर्थ हस्ते कोविड-19 वायरस प्रतिबंध लस घेतली.
सदर कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनी घेण्याचे आवाहन यावेळी भाई केशवराव धोंडगे यांनी केले.
यावेळी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार सोबत डाॅ.प्रा.पुरुषोत्तमराव धोंडगे,भाई माधवराव आंबटवाड,बाळू सोळंके,निलेश गायकवाड यांची उपस्थिती होती.