कंधार ; प्रतिनिधी
युजीसी मान्यता प्राप्त सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे आयोजित राज्यस्तरीय पाञता परीक्षा (सेट) २७ डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेली होती,सदरील परीक्षेत बीट-उस्माननगर गशिअ कार्यालय,कंधार येथील उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी शिक्षणशास्ञ विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
बीट-उस्माननगर गशिअ कार्यालय,कंधार येथील उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर हे विविध उपक्रम राबवत असतात.त्यानी लॉकडाऊन काळात अॉनलाईन नवोदय , मिशन शिष्यवृत्ती परीक्षा , बिटस्तरीय शिक्षण परिषद, गुणवत्ता तपासणी,वृक्षारोपन ,इंग्रजी प्रशिक्षण ,विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती ,युडायस कार्यशाळा यासह अनेक उपक्रम त्यांनी आपल्या बिट मध्ये राबवली आहेत.तसेच शिक्षकानाही अॉनलाईन स्पर्धा घेवुन पुरस्काराने गौरविले आहे.
त्यांनी एम.ए.(मराठी,इंग्रजी,समाजशास्ञ,लोकप्रशासन) ,एम.एस.डब्ल्यू. ,एम.एड., साहित्य रत्नाकर,साहित्य सुधाकर, डी.एस.एम. ,जी.डी.सी.ॲन्ड ए. अशा सर्व प्रकारच्या डिग्र्या प्राप्त केल्या आहेत. शिक्षण सेवक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा त्यांचा प्रवास आहे.
विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी युजीसी मान्यता प्राप्त सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे आयोजित राज्यस्तरीय पाञता परीक्षा (सेट) उत्तीर्ण केल्याबद्दल कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे,सर्व शि.वि.अ. सतिश व्यवहारे , कैलास होनधरणे ,पांडे साहेब, अंजली कापसे, सर्व केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,विषयतज्ञ,व कार्यालयातील कर्मचारी व तालुक्यातील शिक्षक मंडळी यांनी त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.