पोषाख होता फुलेंचा साधाभोळा,…..
कार्याने समाज शिल्पकार झाले!…
अधिश्वरीला प्रथतः शिकवून,…..
नारीशक्तीस शिक्षण खुले केले!…
शब्दबिंब
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
पोषाख होता फुलेंचा साधाभोळा, कार्याने समाज शिल्पकार झाले! अधिश्वरीला प्रथमतः शिकवूनच, नारीशक्तीस शिक्षण खुले केले! पुणे नगरीतील बुधवार पेठेत, मुलींसाठी ज्ञानालय उघडले! फुले विकण्याचा उद्दोग सोडून, मुली अन् मुलांना शिक्षण दिले! कार्य त्यांचे भारतरत्ना समान, फक्त पुरस्काराने वंचित राहिले! समाजातील अस्पृश्यता गाढून, घरचा हौद दलितांना खुले केले! गोविंदराव फुलेंच्या जोतिरावांनी, धर्ममार्तडांचे आवाहन स्विकारले! नारींनी शिक्षण घेणे निषेधार्य, त्या युगात अलौकिक कार्य केले! झाले जोतिराव अन् सावित्री फुले, नारीने आवकाशात यान उडविले! जयंती दिनी काव्य शब्दाभिवादन, माझ्या मुंडासे बहाद्दर अवलियाले!