कंधार ; प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान असून त्यांच्या त्यागामुळेच आजची महीला सक्षम झाली असल्याचे प्रतिपादन कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी कंधार येथे केले.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या यांच्या जयंती निमित्त कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसीकर बोलत होते.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जि.प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांची उपस्थिती होती.