कंधार ; प्रतिनिधी ( प्रदीप गित्ते)
आज दिनांक ११ एप्रिल रोजी कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय येरमे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रीय मुख्याध्यापक व बदली संदर्भात गटसाधन केंद्र कंधारचे काम पाहणारे शिक्षक यांची गुगल मीटद्वारे ऑनलाईन पुर्वनियोजन बैठक घेतली.
सदरील बैठकीमध्ये गटशिक्षणाधिकारी श्री संजय येरमे साहेबांनी नवीन शासन निर्णयानुसार करावयाची कार्यवाही समजून सांगितली. सोबतच बदली संदर्भात सेवाज्येष्ठता यादी मुख्याध्यापकांनी प्रसिद्ध करून काही आक्षेप असतील तर विहित नमुन्यात जमा करावेत असे सांगितले. शिक्षकांनी आपले आक्षेप लेखी स्वरूपात पुराव्यानिशी केंद्रीय मुख्याध्यापक यांच्यामार्फत सादर करण्यास सांगितले. तसेच ज्यांचे आक्षेप नसतील त्यांनी आक्षेप नसल्याचे व माहिती बरोबर आहे असे लेखी प्रमाणित करून मुख्याध्यापकांमार्फत गटसाधन केंद्र कंधार येथे सादर करण्यास सांगितले.
तसेच केंद्र प्रमुख श्री गणेश थोटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार श्री मटके सर यांनी मानले.