भोजूचीवडी येथे महामानवाला अभिवादन..

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती नाचून नाहीतर पुस्तक वाचून मौ भोजूचीवाडी ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली.

आज मौ भोजूचीवाडी ग्रामपंचायत अंतर्गत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

आणि नंतर जवळपास एक ते दोन तास वाचन करून जयंती साजरी करण्यात आली. हा उपक्रम सरपंच प्रतिनिधी सतीश देवकत्ते यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला.

याप्रसंगी मा सरपंच चुडाजी कागणे, आदर्श शिक्षक राजेश देवकत्ते, अर्जुन कागणे, पंढरी श्रीरामे, किशन श्रीरामे, शंकर केंद्रे, दशरथ गुंट्टे, रावसाहेब श्रीरामे, रामेश्वर देवकते, गंगाधर केंद्रे यांच्यासह गावातील प्रौढ व्यक्तीसह तरूण मिञ मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *