फुलवळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फुलवळ ; ( धोंडीबा बोरगावे )

महामानव , बोधिसत्व , भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त फुलवळ ता.कंधार येथे ठिकठिकाणी आज १४ एप्रिल रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोहळा साजरा करतांना फुलवळ येथील ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच विमलबाई मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर जि. प.कें. प्रा.शाळेत मुख्याध्यापक बालाजी केंद्रे आणि श्री बसवेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक बी एन मंगनाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून या महामानवास अभिवादन करण्यात आले .

यावेळी दोन्ही शाळेतील शिक्षक , शिक्षिका तसेच ग्राम पंचायत चे सदस्य बालाजी देवकांबळे , प्रवीण मंगनाळे , इतर कर्मचारी हिरकांत मंगनाळे , कैलास मंगनाळे , इब्राहिम पठाण , पत्रकार धोंडीबा बोरगावे ,मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते ,शादुल शेख ,ग्रामस्थ नागनाथ मंगनाळे , नागनाथ गोधणे , नवनाथ बनसोडे , गंगाधर शेळगावे , कामाजी मंगनाळे , रहीम शेख , मोकिंद देवकांबळे , केदार देवकांबळे यांची उपस्थित होते.



कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता तो रोखण्यासाठी आणि त्यापासून नागरिक सुरक्षित राहण्यासाठी म्हणून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून फुलवळ ग्राम पंचायत च्या वतीने गावात सॅनिटायझर ची फावरणीला सुरुवात केली आहे. आज प्रामुख्याने गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा बाजूने प्रथमतः फावरणीला सुरुवात केली असून लवकरच संपूर्ण गावात सॅनिटायझर ची फवारणी करणार असल्याचे ग्राम पंचायत कडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *