कंधार ; प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार व कंधार येथील शांतता कमिटीत प्रशासनाने समाजबांधवांना केलेले आवाहना नुसार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी राहून साजरी करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा कंधार च्या वतीने करण्यात आले आहे.
कंधार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि.१४ एप्रिल रोजी सकाळी नऊपासून नियोजित कार्यक्रम संपन्न होणार आहेत. केवळ मोजक्याच तरुणाने सहभागी व्हावे व बाकी समाज बांधवांनी कोरोना पासून बचावासाठी घरीच सुरक्षित राहून महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे तथा गर्दी न करता सोशल डिस्टसींग चा अवलंब करुन ,मॉस्क,सँनिटायझर वापरुन अभिवादन करावे असे आव्हान भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कंधार तालुका अध्यक्ष विलास कांबळे सचिव एन एन कांबळे कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे संघटक सुदाम बोडके,शहराध्यक्ष निलेश गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा शाखा कंधार च्या वतीने करण्यात आले आहे.