रामरहीम नगर कंधार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

भारत भाग्य विधाता,भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रामरहीम नगर कंधार येथील चौकाच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर मा. नगरसेवक बंडू उर्फ राजेंद्र नारायणराव कांबळे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी समता सैनिक दलाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनकांबळे,समता सैनिक दलाचे कंधार तालुका उपाध्यक्ष संतोष दुंडे,सैनिक विलास ढवळे,विलास सोनकांबळे,सुधाकर सोनकांबळे,पांडुरंग सोनकांबळे,पत्रकार संभाजी कांबळे आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *