पोलिस स्टेशनात चिमूकल्याचा वाढदिवस साजरा ;कोरोना योद्ध्यांची सेवा म्हणून पोलीस स्टेशनला २० खुर्ची भेट

कंधार 
कंधार तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून सेवा बजावत असलेले भूषण पेठकर यांचा भाचा रुद्र उमाकांत बरडे या चिमुकल्याचा वाढदिवस दि.२७ जुलै रोजी कंधार येथिल पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात आला तसेच वाढदिवसा निमित्ताने कोरोना योद्ध्याची सेवा बजावणा-या पोलीसांची सेवा घडावी म्हणून २० खुर्च्या भेट देवून आगळा वेगळा वाढदिवस घेण्यात आला.   
सध्या कोरोनाने संपुर्ण जगात थैमान घातले असतानाही भूषण पेठकर यांच्या संकल्पनेतुन रुद्र उमाकांत बरडे याचा वाढदिवस कंधार पोलिस स्टेशन येथे साजरा करुन कोरोना योद्ध्यांची सेवा म्हणून २०खुर्ची भेट म्हणुन देण्याची इच्छा कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी परवाणगी देवुन स्वतः शुभेच्छा दिल्या.या लहानशा उपक्रमामुळे  एवढ्या ताणतवात सुद्धा पोलिस बांधवांच्या चेहऱ्यावर क्षणीक आनंद पहायला मिळाला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विकासची जाधव , कंधार भाजपाचे शहराध्यक्ष अँड.गंगाप्रसाद यन्नावार, पं स सदस्य सत्यनारायण मानसपुरे  ,  सुनिल पत्रे , गणेश पाटील पेठकर , जिवन पाटील पेठकर , गजानन पाटील पेठकर आदींची यावेळी  उपस्तिथी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *