कंधार ;
महाराष्ट्र राज्यातील मातंगसमाजाच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक विकास झालेला नाही. आजही मातंग समाजातील विद्यार्थीशिक्षणापासून बऱ्याच प्रमाणात वंचीत आहे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सामाजिक,शैक्षणिकउन्नती होणे आवश्यक आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) या प्रमाणेच स्वातंत्र्यपणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यातयावी अशी मागणी दि.२७ जुलै रोजी रेड पँथरचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ मळगे यांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे.
दरम्यान शताब्दी जयंती वर्षानिमित्य मातंग समाजातीलविविध संघटना व समाज बांधवाची ही मागणी आहे. (आर्टी) ची स्थापना झाल्यामुळे मातंग समाजातीलविद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचेसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतीलसहभाग अग्रणी आहे. मागास समाताजून पुढे आलेल्या आदरणीय अण्णाभाऊ साठे यांनी वंचीत समाजाच्याव्यथा,वेदना आपल्या साहित्यातून कृतीतून अत्यंत परिणामकारक रित्या मांडल्या. त्यांना मरणोत्तर “भारतरत्न”किताब देण्यासाठी राज्यमंत्री मंडळाने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे या बाबत पाठपुरावा करुन त्यांनाभारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी रेड पँथरचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ मळगे यांच्याकडूनकरण्यात येत आहे.