फुलवळ येथिल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

Kandhar ,yugsakshi 26/08/2020
 कारोना सारखी महामारी सुरू असताना फुलवळ गणात कारोना चा एक रुग्ण मृत्यू पावला तर 14 रूग्ण पाॅझेटिव्ह असताना अधिकारी तिथे फिरकतच नसल्याने निषेध व्यक्त करत फुलवळ गणाचे पं. स. सदस्य  सदस्य उतम चव्हाण यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले.    २४ रोजी पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई घोरबांड यांच्या अध्यक्षतेखाली  पंचायत समितीची सर्वसाधारण सभा होती. या बैठकीस गटविकास अधिकारी यु. टी. राहाटीकर, गटशिक्षणाधिकारी संजय येरमे,पाणीपुरवठा अभियंता डिकळे, विस्तार अधिकारी शिवाजी ढवळे, तिरूपती गुटे, तोटेवाड हे उपस्थित होते तर याकडे बर्‍याच अधिकार्‍यांनी पाठ फिरविली. यामुळे सदस्य रागवणे साहाजिकच होते.फुलवळ पंचायत समितीचे सदस्य उतम चव्हाण यांनी माझ्या फुलवळ गणात आज घडीला  एक रूग्णाचा मृत्यू तर 14 रुग्ण पाॕजिटिव्ह निघाले आहेत तर त्यांच्या संपर्कात आलेल्या तीस ते पस्तीस रुग्णाना फुलवळ येथे. बसवेश्वर विद्यालय, कंधार व  लोहा येथे कारनटाईन करण्यात आले. सदर रुग्ण व नागरिक  भयभीत झालेल्या गावकऱ्यांना कुठलाच अधिकारी, अॅन्टि कोरोना टाक्स फोर्स कमीटी,आरोग्यसेविका शिवाय कुठल्याही आरोग्य अधिकारी भेटण्यास अथवा दिलासा देण्यासाठी आला नाही. विशेष म्हणजे ज्या आरोग्य सेविका सदर कारनटाईन केलेल्या रूग्णाची देखभाल करत आहेत त्यांना पिपीई किटी न दिल्याने ते आपल्या जिवाची पर्वा न करता आपली रूग्णसेवा बजावत आहेत. ह्या बाबतीत पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण यांनी पाणी पुरवठा, कृषी, आरोग्य, बाल प्रकल्प, विद्युत वितरण विभागाच्या विभाग प्रमुखांना जाब  विचारला.

 यामध्ये पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, महावितरण कंपनी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना धारैवर धरून सुरळीत पाणी पुरवठा करणे , नियमीत दिवाबत्ती व अंगणवाडी सेविका व आशावर्कस यांना साहित्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली करून  आरोग्य विभागाने सर्व आरोग्य सुविधा नागरिकांना  देण्याच्या  सुचना दिल्या. यापुढे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासादायक वागणूक दिली गेली नाही तरअधिकाऱ्यांना  त्यांच्या कार्यालयात कोंडून त्यांचे  लॉकडाऊन  करण्याचा इशारा उत्तम चव्हाण यांनी  दिला.यावेळी उपसभापती लताताई वडजे,भिमराव जायभाय, सत्यनारायण मानसपुरे,लक्ष्मीबाई देशमुख यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *