Nanded – by Gangadhar Dhavale 25 July 2020
कँलनमँपल पब्लिशिंग, मावेरिक आर्टिस्ट व नोशनप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होणाऱ्या ‘अंतरनाद’ या दी बेस्ट मोटिव्हेटर स्तंभलेखक, शिवशंभुरत्न इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर लिखित आगामी साहित्य संग्रहात नकारात्मक भाव पुसुन टाकण्याची जबरदस्त क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येक घरात ‘अंतरनाद’ची प्रत असलीच पाहिजे अशी वास्तववादी प्रतिक्रिया दि.२५ जुलै रोजी मराठवाड्यातील सुप्रसिध्द आहारतज्ञ डॉ. उषा प्रदीप जाधव यांनी नांदेड येथे दिली.
जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच विद्यार्थीह्रदयसम्राट इंजि. शिवाजीराजे पाटील यांच्यावतीने लॉकडाऊनच्या काळात वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘हाजीर हो घरोघरी’ या अभियानांतर्गत शिवाजी नगर नांदेड येथील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या आहारतज्ञ डॉ. उषा जाधव यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.यावेळी माध्यम सल्लागार प्रा. रामेश्वर बद्दर रेणापुरकर, जेष्ठ साहित्यीक कवी डॉ. जगदीश कदम, नांदेडच्या निर्मल प्रकाशनचे संस्थापक निर्मलकुमार सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, संपादक गोविंदराव निकम, मिडिया पार्टनर स्वप्नील बेंद्रिकर, प्रा. गणेश शिंदे सेलुकर, इलेक्ट्रॉनिक मिडिया चिफ संगमेश्वर लांडगे, प्राचार्य आनंद कदम, निवेदक देवदत्त साने आदीची उपस्थिती होती.