फुलवळ ;
फुलवळ तालुका कंधार येथील भुमिपुञ तथा दै. सकाळ चे पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी कोरोना सारख्या संकटात सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याची भारतीय जनता पार्टीने दखल घेऊन सन्मान पञ देऊन गौरव केला आहे.
देशासह राज्यात कोरोना सारख्या महामारी रोगाने थैमान घातले आहे. मार्च महिन्यापासून आजपर्यंत कोरोना संपला नाही अजूनही रूग्ण वाढतच आहेत यामुळे शासनाने युध्द पातळीवर प्रयत्न करीत असून ही महामारी रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी मोठे प्रयत्न होत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नका घरीच रहा सुरक्षीत रहा असे आवाहना बरोबर सर्वच ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आले. विशेष फुलवळ सारख्या खेडेगावात गेले काही दिवसात रूग्ण संख्या झपाट्याने वाढत होते.
याच काळात आपल्या कामाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी आपल्या सहकारी पत्रकारांना सोबत घेऊन कोरोना संबंधित सकारात्मक जनजागृती करत इतरही अनेक चांगले कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने गौरव करून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
रक्षाबंधन निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्ह्याच्या महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा सौ. चित्ररेखाताई गोरे यांनी राखी बांधून भावबंध वृद्धिंगत केले तर कंधार न.प. चे उपनगराध्यक्ष आमचे वर्गमित्र जफर बहोद्दीन यांच्या वतीने मास्क , सॅनिटायझर देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे बाबुरावजी केंद्रे , गंगाप्रसाद यन्नावार , सुनील कांबळे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.