काव्य …… आठवण माईची

माय तू गं माऊली कृपेची साऊली

तुझ्या करुणेची ज्योत मनात तेवत राहिली !

तुझा वरादहस्त जणू कृपेची छाया

केलीस सर्वांवर तू भरभरुन माया !

प्रेमस्वरुपी तू ज्वलंत निरंतर या मनी

तुझ्या आशीर्वादासाठी आहोत

 जीवनभर ऋणी !

साऱ्यांची माय कृष्णामाय म्हणून

 तुझी प्रसिद्धी 

तुझ्या आशीर्वादाने घरात नांदते सुख-समृद्धी !

प्रेमाचा तुझ्या ह्रदयात अथांग सागर

कधीच रीती झाली नाही तुझ्या

 करुणेची घागर !

आज आहे तुझे पुण्यस्मरण गं द्वितीय

 करुणा, माया, लडिवाळा तुझा गं

 अद्वितीय !

तू होतीस भक्कम आधार साऱ्या

 घराचा

प्रेमाने सजविलास घरातील प्रत्येक

 साचा !

तुझ्या सद्गुणांची पंचक्रोशीत आहे गं

 छाप

सद् वर्तनामुळे यश, किर्ती

 मिळविलीस अमाप !

माय तुझा आशीर्वाद सदैव आम्हांवर

 राहू दे

जीवनातील चढ-उतार सहन

 करण्याची शक्ती दे !

एवढे मागणे तुझ्याठायी साऱ्यांकडे

 भरभरून पहा

आम्हां साऱ्यांच्या गं तू सदैव पाठीशी

 रहा.. !

डॉ.मिनाक्षी प्रकाश सादलापूरे

कंधार ता.कंधार

 जि.नांदेड           
मो. ८२०८७६७८७७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *