जेवण आणि प्रसाद यातील फरक ..

 

दोन दिवसांपुर्वी सकाळी साधारणपणे ११ च्या सुमारास माझ्या मित्राचा फोन आला जो मित्र मुंबईत रहातो.. त्याची मुलगी पुण्यात शिकायला असते तिला त्रास होत होता म्हणुन ॲडमीट केलं होतं.. फोनवर तो म्हणाला , अगं मनुला ॲडमीट केलय , मेजर काही नाही त्यामुळे मी मंगेशकरमधे आहे.. आपल्याला भेटता येईल का ??,, मी म्हटलं दुपारी प्रसाद घेउन मीच येईन .. चालेल का तुला ??.. तो म्हणाला , अगं बायको पण आहे सोबत तिला तुझ्याबद्द्ल काहीही माहित नाही.. मी म्हटलं , तिला सांग ना फ्रेंड आहे आणि दुसरं म्हणजे मनुला मला प्रसाद खाऊ घालता येईल.. तो म्हणाला , ठिक आहे ..

मी १२ . ३० वाजता गेटपाशी गेल्यावर तिथून त्याला फोन केला.. तो मला घ्यायला आला.. मी सोबत टिफीन घेउन गेले होते.. हातात डबा पाहुन तो म्हणाला , अगं इतका प्रसाद ??.. मी रुममधे गेल्यावर मला पाहून त्याची बायको इतकी खुश झाली कारण ती माझी वाचक आहे.. त्यांच्या हातात प्रसाद दिला आणि मुलीशी बोलल्यावर तिला म्हटलं , भुक लागलेय कागं ? .. मी तुझ्यासाठी प्रसाद घेउन आलेय.. तिलाही वाटलं ,प्रसाद म्हणजे थोडं काहीतरी असेल .. तिच्या आईने ताटात डब्यातली पोळी भाजी , कोशींबीर घेउन तिला भरवायला सुरुवात केली आणि तिचा चेहरा खुलत गेला.. ती म्हणाली , सोनल मावशी हा प्रसाद तु केला आहेस का ??.. मी म्हटलं , हो मी रोज फक्त प्रसादच खाते.. बाबा अरे खाऊन बघ ना.. ती तिच्या बाबाला म्हणाली , इतकं भारी जेवण मी याआधी कधीच खाल्लं नव्हतं.. त्यावर मी म्हटलं , तु रोज जेवतेस ना म्हणुन तुला आवडत नाही .. तु रोज प्रसाद खाल्लास तर तुला आवडेल.. दोघी मायलेकी माझ्याकडे कुतूहलाने पहात होत्या.. तिने भरपूर प्रसाद खाल्ला .. ती सर्वाथाने तृप्त झालेली पाहुन मी मनातच श्रीकृष्णाचे आभार मानले..

मनुची आई म्हणाली , आज तीन दिवसाने तिने पोटभर खाल्लं.. ती म्हणाली , मला सांगा ना हे कसं बनवलं..?? मी चेष्टेच्या मुडमधे म्हटलं , आपण कोणाला बनवु नये .. मित्राला जोक कळला तो म्हणाला , सोनल अगं तीन दिवसांनी हसलो गं.. तिला प्रसाद खाताना पाहून मलाही तुझ्या श्रीकृष्णाचे आभार मानावे वाटले.. मनुची आई म्हणाली , रोज तुमची आर्टीकल्स वाचत होते पण तुम्ही यांना ओळखता मला माहित नव्हतं.. मी त्यांना म्हटलं , कांदा लसूण न घालता महामंत्र ऐकत मी प्रसाद तयार करते आणि कृष्णाला देते. त्याने खाल्लं कि मग आम्ही खातो त्यामुळे त्याची लाळ त्यात उतरते आणि मग तो प्रसाद टेस्टी होतो.. मनु म्हणाली , Wow thats intresting .. मम्मा तु पण इथून पुढे असा प्रसाद कर ना.. मला इथे होस्टेल ला प्रसाद मिळणार नाही पण घरी येईन तेव्हा खाईन..

प्रसाद करताना स्वच्छता महत्वाची त्यामुळे आंघोळ करुन नैवेद्य तयार करायचा यात आपल्याला स्वच्छतेचं महत्व सांगितले आहे..
प्रसाद तयार करताना आपण आधी त्याची चव घेउ शकत नाही त्यामुळे आपला आपल्यावर सय्यम किती आहे हे कळतं..
प्रसाद करताना सगळ्या पदार्थांचे प्रमाण हे योग्य असायला हवे त्यातून आपल्याला मॅनेजमेन्ट कळते..
प्रसाद सगळ्याना वाटला जातो त्यातून शेअरींग चं महत्व कळतं..
प्रसाद वाटताना त्यात फक्त देण्याची वृत्ती असते.. तिथे घेण्याची वृत्ती नष्ट होते..
हे सगळे गुण जेवणात मिळत नाहीत म्हणुन प्रसाद रुचकर असतो.. खाणाऱ्यानेही तो त्याच भावनेने खायचा असतो तरच भगवंत भेटल्याची अनुभूती येते…
ऱोज जेवणाऐवजी प्रसाद खाऊन आणि खाऊ घालून पहा.. सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला इथे मिळेल.. रोज प्रसाद खाल्ल्याने आपले आचार विचार बदलतात आणि राग निघून जातो.. जसं अन्न तसं मन म्हणून प्रसादाला महत्व आहे..

#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *