तुम्ही कधी निरीक्षण केलय का ???

 

खुप योगायोग असतात किवा खरच यांचा संबंध ॲस्टॉलॉजी , न्युमरॉलॉजी याच्याशी असावा किवा आपल्या कर्मानुसार किवा राशीनुसार तशा व्यक्ती आपल्या संपर्कात येत असाव्यात.. मी अशा व्यक्तीचा अभ्यास करत असते .. त्याचा उपयोग माझ्या लेखणीसाठी होतो किवा निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी होतो..
मिलिंद नावाच्या पाच व्यक्ती माझे फ्रेन्ड्स आहेत त्या पाचही जणांची रास ही तुळ आहे..
विवेक नावाचे माझे चार मित्र आहेत .. चौघेही मिडीयम उंची , सडपातळ , हॅंडसम , आणि प्रचंड ड्रिंक आणि स्मोकचे चाहते..

मिथून राशीची माणसे खुप जास्त प्रमाणात माझ्या अवतीभवती असतात .. त्यातील बरेचसे माझे मित्र आहेत.. त्यातील जवळपास ९०% टक्के हे प्रचंड थापाडे , चिकट ( हातातून कधीही काहीही न सुटणारे ) आहेत.. खोटं बोलण्यात यांचा हात कोणीही धरु शकत नाही.. सगळे नक्कीच नसतील किवा तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असेल पण निरीक्षण केलं तर खूपच गोष्टी सारख्या आढळतात..
मेष राशीचे अनेक माझे मित्र.. प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो पण त्यांची एक खासियत असते आणि ती म्हणजे भेटायचा किवा कुठेतरी जायचा त्यांना उत्साह फार असतो पण एखाद्या जागी गेले कि दहाव्या मिनीटात म्हणतात , ‘ चला निघायचे का ??.. उदाहरण द्यायचे तर महाबळेश्वर किवा लोणावळा अशा ठिकाणी पुण्यापासून जायला दिढ तास लागतो .. तिथे गेलो आणि खाऊन झालं कि लगेच परत निघायची तयारी ..त्यांच्या सोबत गेलो कि असं होतं , अरे मग आलो कशाला ??.. डोक्यात सतत बिझनेसचे विचार असतात.. स्थिरता किवा शांतता अजिबात नाही.. ही मंडळी बेडवर सुध्दा अशीच घाई करत असावीत..आनंद घेणं यांना जमतच नाही.. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका प्लेसला गेले कि दुसऱ्या प्लेसचा विचार करणार आणि आनंद कुठेही घेणार नाहीत.. अनिल नावाचे तीन्ही मित्र मेषेचे आहेत..

कन्या राशीच्या व्यक्ती प्रचंड प्रमाणात बडबड आणि दुसऱ्याचं अजिबात ऐकत नाहीत.. पहा निरीक्षण करुन कन्या राशीची एखादी व्यक्ती घरात असेल तर सगळ्या डब्यांची झाकणे अर्धवट लावलेली दिसतील किवा अघळपघळ राहणीमान दिसेल.. हिरव्यावर निळं , पिवळ्यावर सोनेरी अशा प्रकारचे कपडे दिसले कि समजायचे हे ध्यान कन्येचं आहे.. उदाहरण द्यायचे झाले तर याना विचारा , साताऱ्यात कसे जायचे ??.. ते अशी काही लामण लावतात कि त्या वेळेत आपण साताऱ्यात जाऊन पोचतो.. पण प्रचंड साफ मनाचीही असतात.. खुप खरी आणि खुप प्रामाणिक..

मी एखाद्याला भेटले कि पाचव्या मिनीटात त्याची कुंडली कळते त्यावरुन त्याच्याशी मैत्री करायची कि नाही हे ठरवते आणि त्यानुसार पुन्हा भेटायचे कि नाही हेही ठरते..
तसच वृषभ राशीचे पाच मित्र आहेत .. त्या पाच जणात एकही साम्य नाही.. एक प्रचंड रसिक तर उरलेले ठोंबे.. जवळपास या राशीतील ९०% मंडळी चा अध्यात्म , देव यांच्याशी काहीही संबंध नसतो.. पण पैसा , प्रॉपर्टी आणि कुटुंब यात प्रचंड जीव अडकलेला असतो..
हा माझ्या संपर्कातील व्यक्तीबदलचा माझा अनुभव आहे.. तुमचा याच राशीबद्दल वेगळा अनुभव असु शकतो.. यात चूक ,बरोबर काहीही नाही पण अभ्यास किवा निरीक्षण असेल तर आपलं व्यक्तीमत्व कोणाशी मॅच होईल हे ठरवता येतं आणि त्यानुसार त्याच्याशी व्यवहार , नाती जोडता येतात.. सगळी मज्जा आहे.. यातून आनंद घ्यायचा आणि काही नाती नाही आवडली तरीही जपावी लागतात आणि त्यांचे स्वभाव माहीत असूनही ॲडजस्ट करुन रहावं लागतं… पण निरीक्षण करणं सोडायचं नाही..

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *