जी एस चिटमलवार ; एक दिपस्तंभ

 

 

महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रांत उपाध्यक्ष आमच्या सर्व मुख्याध्यापकांचे मुख्याध्यापक मार्गदर्शक नामवंत महात्मा फुले प्राथमिक शाळेचे माजी से. निवृत्त मुख्याध्यापक श्री जी एस चिटमलवार सर, दोन मार्च 1952 ते दोन मार्च 2025 आपला 73 वा वाढदिवस साजरा होत असताना निश्चितच मला आनंद होत आहे. सर शिक्षकी पेशावर नितांत प्रेम करत गेली 35 वर्षापासून अध्यापन व प्रशासन या क्षेत्रात आपले कार्य अतिशय तेजस्वी रूपाचे राहिले आहे.

मागासलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपली सततची धडपड व त्या दिशेने केलेले प्रयत्न भावी शिक्षणासाठी एक दीपस्तंभ होय. मी बिलोली येथील विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना 2003 रोजी सरांची माझी संघटनेच्या माध्यमातून ओळख झाली. आणि मला त्यांनी बिलोली तालुका अध्यक्ष पदाची धुरा आदरणीय ए टी पायरे सर व गंगाधर मठदेवरु सर सगरोळी. यांच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली, या रूपाने मला एक वटवृक्ष मिळाला . गेली बावीस वर्षे झाले मी सरांबरोबर काम करत आहे ,जसे चिटमलवार सर.माजी आ. मा .मुकुंदरावजी कुलकर्णी. ह.रा मानधने.कै. भगवानराव शेटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व कै. अरिफ खान, व्ही एन फुलवले सर, डी जे केंद्रे सर, व जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मुदखेड पंचायत समितीचे माजी सभापती नांदेड पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव सर, यांच्यासोबत आपण केलेले कार्य अतिशय सरस व मैत्रीपूर्ण राहिले आहे.

संघटनेच्या माध्यमातून पे युनिट पोषण आहार जी पी एफ फी माफी शिक्षकेतर कर्मचारी लिपिक मान्यता असे अनेक प्रश्न आपण जिल्हाध्यक्ष असताना मार्गी लावलात, यात आपला सहभाग महत्वपूर्ण राहिला आहे. आपल्यासारख्या धवल चारित्र्य व संघटनेवर मनापासून प्रेम करणारा अग्रणी माणूस संघटनेचे भूषणच होय, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेणे बैठका घेणे निधी जमा करून प्रांत कार्यकारिणीला पाठवणे, वेळप्रसंगी खिशाला कात्री लावून संघटना जिवंत ठेवण्याचे काम आपण केलात, आणि मलाही मोठ्या उत्साहाने संघटनेचे काम करायला लावलात, बिलोली म्हणजे माझा हक्काचा माणूस व तालुका आपण मानलात,महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन म्हणून पंचवीस वर्षे आपण सेवा केलात हा नवा विक्रमच होय, कुशाग्र बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम, उच्च कोटीचा, त्याग या गुणाने आपण शिक्षक संघटना व समाजसेवा या क्षेत्रात नवीन पाऊलवाट निर्माण केलात आहात.

नांदेडच्या मातीत वाढलेला हा वटवृक्ष आम्हास सर्व मुख्याध्यापकांना शिक्षकांना आदर्श ठरला आहे. या आपल्या अद्वितीय कार्याची महाराष्ट्र शासनाने नोंद घेऊन आपणास राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आज 73 वर्षे वय असूनही आपण संघटनेचा श्वास आहात, पण जिल्ह्यात 310 प्राथमिक शाळा असून आपल्या हक्काच्या अर्जित रजा रोखीकरण मागणीसाठी फक्त तिसच मुख्याध्यापक बैठकीला उपस्थित राहतात हे आमचं दुर्दैव आहे.आपल्या सोबत काम करताना मला एक ऊर्जा मिळते. नुकतेच शिक्षक संचालक पुणे, यांनी प्राथमिक मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या बाबतीत मोठा धक्कादायक व आर्थिक हानी करणारा निर्णय घेतला, या विरोधातही आपण आवाज उठवण्यासाठी माझी खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक रजा रोखीकरण संघर्ष समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करून याही वयात माझ्याकडून काम करून घेण्याची तुमची वृत्ती अजूनही नेक आहे. आपल्या 74 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या वयाला सलाम करून आपलं आरोग्य निश्चितच चांगले राहावे अशी प्रार्थना करून आपणास वाढदिवसाच्या मनस्वी मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो .

 

आपलाच पत्रकार अशोक दगडे मुख्याध्यापक विद्यानिकेतन बिलोली.

तथा मा सरपंच चिरली टाकळी थळी . अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार प्रतिष्ठान बिलोली. अध्यक्ष खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक रजा रोखीकरण संघर्ष समिती नांदेड. जिल्हा उपाध्यक्ष महासंघ नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *