गौरी-गणपती च्या आकर्षणासाठी हस्तकलेतून साकारले दत्तात्रय एमेकर यांनी पेंग्विन पक्षी….!

कंधार; डॉ.माधव कुद्रे 


कोरोना संकटकाळात घरीच लाॅकडाऊन राहिल्याने वेळ भरपुर मिळाला त्या वेळेचा उपयोग करत आपल्या सृजनशीलतेस चालना देत घरात असलेल्या माध्यमांचा वापर करुन बर्फाळ प्रदेशात वास्तव्यास असलेली पेंग्विन पक्ष्यांची जोडी तयार केली असून या लाॅकडाउनच्या कालखंडात त्यांनी जवळपास 15/20 कलाकृती साकारल्या आहेत.आगामी गौरी-गणपती च्या सणाचे आकर्षणासाठी जोरदार तयारी शिवाजी नगर कंधार येथे झाली आहे.
 आपल्या कला-कौशल्याने ओळखली जाणारी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांनी आज पर्यंत अनेक कलाकृती साकारुन आपली ओळख निर्माण केली.या वर्षी येत असलेल्या गौरी-गणपतीच्या सणा निमित्य पेंग्विन पक्षाची जोडी तयार केली.ही कला सारतांना कोरोना संकटकाळी घरीच सुरक्षित राहिल्याने वेळेचा सदउपयोग करतांना ही कला निर्मिती झाली.असल्याचे सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार चे संस्थापक दत्तात्रय एमेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *