लोहा ; प्रतिनिधी ( शिवराज दाढेल लोहेकर)
लोहा कोविड सेंटर येथे लोहा- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आज दि.२२ एप्रिल रोजी भेट देऊन रुग्णांची अस्थेवाईकपणे चौकशी केली व कोविड सेंटर लोहा येथे पाहणी केली व रेडमीसीविर इंजेक्शन,ऑक्सिजन व्यवस्था,स्वच्छता,पाणी व जेवण आदि बाबीविषयी वैद्यकीय अधिकारीसोबत व विविध विभागाचे अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली.
रेडमीसिविर इंजेक्शन ची कमतरता भासू नये म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांना फोन करून कोविड सेंटरला इंजेक्शन, ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण मुंडे, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे,ज्ञानोबा पवार,सतीश कराळे,सिद्धेश्वर वडजे,नागेश खांबेगावकर,प्रसाद जाधव सह अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.