कंधार ; दत्तात्रय एमेकर
कंधार तालुका म्हणजे चळवळीचा तालुका म्हणून सुप्रसिद्ध आहे.जरी तो डोंगर-दर्याने व्यापलेला असला तरीही राजकारणत अव्वल आहे.मन्याड धरणाचा विरोधातला लढा असो का शे.का.पक्षाचा प्रचार असो का शैक्षणिक कार्य असो!यात आपले नेते डाॅ.भाई केशवराव धोंडगै साहेब व भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून बारुळ पंचक्रोशीवर नेतृत्व करणारे तत्त्वनिष्ठ, धेय्यवेडे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेतृत्ववीर ग्राम पंचायत बारुळ नगरीचे माजी सरपंच,महादेव मंदिर बारुळ ट्रस्टचे अध्यक्ष व श्री शिवाजी विद्यालय बारुळ शाखेचे शालेय समिती अध्यक्ष ,बारुळ नगरीचे शिल्पकार,बारुळ भुषण,व्यक्तीमत्व देशमुखी थाटातली पण समाजात वागतांना बारुळ अख्ख गाव म्हणजे त्यांनी आपला परिवारच माननारे दिवंगत भाई सदाशिवराव नाईक (पिलू मालक) या नावाने त्याचे कार्य लाख मोलाचे श्री शिवाजी शाळा म्हणजे गोर-गरीबांच्या लेकरांचे लंगर यासाठी ते सतसवरवंट नगरीचे प्रतिष्ठित नागरिक माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच,चेअरमन सेवासोसायटी वरवंट,श्री शिवाजी विद्यालय बारुळचे सदस्य,वरवंट नगरीचे भुषण दिवंगत भाई मुरारी पा.वरवंटकर या दोन निस्वार्थी शिलेदारांनी आपले तत्व कधीच डगमगून देता आयुष्यभर भाईच राहून जगाचा निरोप घेतला. एका पंधरवड्यात दोन रत्न या पंचक्रोशीने गमावले.या दोन्ही शिलेदारांनी राजकारणातील अनेक अमिषे धुडकावून लाल बावट्याची निष्ठा कधी ढळू दिली नाही.बारुळ पंचक्रोशीत प्रत्येक जनतेच्या अडीअडचणी सोडवणारे खरे समाज म्हणून इतिहासात नाव कोरले.
यांना सहवास मला लाभला तो जुन १९९४ पासून श्री शिवाजी विद्यालय बारुळ येथे सेवेला प्रारंभ केला.तेंव्हापासून मी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.काम कोणाचेही असो त्यांच्याकडे कोणी आला की त्यांचे काम म्हणजे स्वतःचे काम समजून पुर्ण करुन त्यांना समाधन देत.या दोन भाईंचे काम समाजाच्या हिताचे होते.मन्याड धरणाचा लढा का कोणताही कंधार मामलेदार कार्यालयावर असला की ही जोडगोळी कार्यकर्त्यांना घेवून कंधार शहराकडे अगदी वेळेवर निघत त्यांनी जीवाभावाचे साथीदार निर्माण करुन शे.का.पक्षाचा लाल बावटा उभी हयात डौलाने फडकत ठेवला.पण आपली निष्ठा कधी कलंकीत होवू दिली नाही.डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या नेतृत्वातील जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहिले.ही तत्त्वनिष्ठा सध्या पहावयास मिळणे दुरापास्त आहे.आपल्या नेत्यांचा विचार घराघरात नेवून पोहोचवला.असे दोन हिरे या कंधार तालुक्यातील शे.का.पक्षाने गमावले.यांच्या कार्याला नतमस्तक होवून मानाची कोटी-कोटी जयक्रांति करुन दोन्ही भाईना भावपूर्ण आदरांजली!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार.