कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील कोविड सेंटर येथे लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली व सर्व सोयीसुविधेचा आढावा घेतला तसेच कंधार तहसिल कार्यालयात पाणी टंचाई व कोविड संदर्भात बैठक घेण्यात आली व सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.
सर्व उपाययोजना लवकरात लवकर करण्यात याव्या याबद्दल उपाययोजना करण्यात आल्या तसेच कंधार तहसील येथे पाणी टंचाई व कोविड संदर्भात बैठक घेण्यात आली व सर्व कामे तातडीने मार्गी लावणायचे आदेश यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी बोरगावकर ,जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील,तहसिलदार व्यंकटेश मुंडे,गट विकास अधिकारी बळवंत,पोलीस उपनिरिक्षक संग्राम जाधव,वैद्यकीय अधिक्षक सुर्यकांत लोणीकर,सभापती ज्ञानेश्वर चोंडे,नगरसेवक शहाजी नळगे,नगरसेवक मन्नान चौधरी,तालुका आरोग्य अधिकारी ढवळे,लोहा खरेदी विक्री संघ उपसभापती श्याम अण्णा पवार,बंटी गादेकर,शेरू भाई,अजीम भाई,राम पा. मानसपुरीकर सह कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.