लोहा ; प्रतिनिधी ( शिवराज दाढेल लोहेकर)
लोहा-कंधार तालुक्यात कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोणावर नियंत्रण मिळविण्यासाठी व तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ गुरुवारी लोहा तहसील कार्यालयामध्ये लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.लोहा-कंधार मतदार संघातील सर्व नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वयंस्फूर्तीने कोरोना ची टेस्ट करून घ्यावी व कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले .
यावेळी उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे , वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, तालुका कृषी अधिकारी घुमनवाड, गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, जि .प. सदस्य चंद्रसेन पाटील ,खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार सह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते,
या आढावा बैठकीत आ. शिंदे यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना कोरोनावर नियंत्रण आणण्या संदर्भात सखोल चर्चा करून गावपातळीवर ग्रामसेवक तलाठी यांना ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोना विषयीची भीती संदर्भात जनजागृती व करुन कोरोना लसीच्या फायदा संदर्भात मतदारसंघातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देऊन लोहा-कंधार मतदार संघातील सर्व नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वयंस्फूर्तीने कोरोना ची टेस्ट करून घ्यावी व कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले .
तालुक्यात ज्या ज्या गावात पाणीटंचाई भासत आहे अशा गावात तात्काळ पाणीपुरवठा करण्याच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले, लोहा तालुक्यात आजपर्यंत 45 वर्षावरील 18,500 नागरिकांनी कोरोना लसीकरण केले असून तालुक्यात 69,000 लसीकरण होणे अपेक्षित आहे, तालुक्याचा लसीकरणाचा दर 25% असून लवकरच लसीकरणाचा शंभर टक्के टप्पा गाठण्याचे लक्ष पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शिंदे यांनी तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण मुंडे यांना दिल्या.
कोरोना सेंटरला आमदार शामसुंदर शिंदे यांची भेट
लोहा येथील शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटरला आमदार शामसुंदर शिंदे यांनी काल गुरुवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन कोविड सेंटरची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला ,यावेळी कोविड सेंटरमधील ऑक्सिजन ,रेडिमेसिवीर इंजेक्शन,रुग्णाना पिण्याचे पाणी,जेवण ,स्वच्छता,औषधउपचार या सर्व मूलभूत बाबी चा आमदार शिंदे यांनी पाहणी करून आढावा घेतला.आमदार शिंदे यांनी कोरोनाच्या संकटात याअगोदर ही पाच वेळेस कोविड सेंटर ला भेट देऊन आढावा घेतला होता यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, ज्ञानोबा पाटील पवार ,सतीश कराळे, सिद्धू पाटील वडजे,सुधाकर सातपुते, शुभम कदम, नागेश खाबेगावकर,प्रसाद जाधव सह कार्यकर्ते,अधिकारी,पदाधिकारी व कर्मचारी सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करत उपस्थित होते.