कंधार ;प्रतिनिधी
कंधार येथिल कोव्हीड सेंटरला आज दि.२२ रोज गुरुवारी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी भेट देवून समस्या ,औषध व रुग्णांची सोय या बाबत डॉक्टरांकडून माहीती घेतली.
व्यंकटेश मुंडे तहसीलदार कंधार यांनी भेट देऊन पाहणी केली व संबधित डॉ यांच्या व पेंशट च्या अडचणी ऐकून घेऊन आजच कोविड सेंटर कंधार ला पंखे व फवारणी फवारा व खुर्ची व नवीन लाईट लावून दिल्या. त्यावेळी गटविकास अधिकारी के. व्ही बळंवत. कोविड सेंटर इनचार्ज डॉ पदमवार साहेब व डाॅ लुंगारे मॅडम मरशिवणे व राम पांचाळ व थोटे एम बी उपस्थित होते.