भदंत सत्यशिल महाथेरो यांचे निर्वाण;


नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वास्तव्यास असलेले पुज्य भदंत सत्यशिल थेरो यांचे  दि.  २३ एप्रिल रोजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे सायंकाळी ७.०० वा. वृद्धापकाळाने निर्वाण झाले. यासमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.

त्यांच्या पार्थिवावर खुरगाव येथे दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खूसंघाची उपस्थिती होती.  पुज्य भदंत पय्याबोधी थेरो यांनी त्यांची अखेरच्या क्षणापर्यंत सेवा केली. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुका परिसरात  भदंत सत्यशिल महाथेरो यांनी धम्मचळवळ गतीमान केली. बुध्दभुमी माळवटा येथे त्यांनी सतत पंधरा वर्ष धम्मपरिषदेच्या माध्यमातून लोकांमध्ये धम्म रुजवण्यांचे कार्य केले. 

भदंत सत्यशिल महाथेरो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *