कोटबाजार येथे इफ्तार नंतर रात्री कोवीड लसीकरण

“ए.एन.एम.सौ.विद्या चंदेल-राजपूत यांचे सर्वत्र कौतुक”

नांदेड जिल्ह्यातील पहिलीच घटना

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

  • आरोग्य उपकेंद्र बहादरपुरा अंतर्गत असलेल्या कोटबाजार या गावात बहुतांश मुस्लिम बांधवांची वस्ती आहे,आजमितीला मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने त्यांचा रोझा म्हणजेच उपवास असतो व कोवीड लस ही पोटभर जेवल्यावरच द्यावयाची असल्याने दिवसभरात देता येत नव्हती म्हणून इफ्तार नंतर म्हणजेच रोझा उपवास सोडल्यानंतर चक्क रात्री ८:३० वाजता कोटबाजार येथे जाऊन बहादरपुरा आरोग्य उपकेन्द्राच्या इनचार्ज ए.एन.एम.सौ.विद्या
  • चंदेल-राजपूत यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मँडम यांच्या नियोजनानुसार समुदाय अधिकारी डॉ. दिपाली गोरे यांच्या देखरेखीखाली कोटबाजार येथील नागरिकांना कोवीड चा पहिला डोज दिला,अशाप्रकारे रोजा सोडल्यानंतर मुस्लिम बांधवांना रात्री उशिरा कोवीड लस टोचण्याची कदाचित ही नांदेड जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी असे बोलले जात असून कर्तव्यदक्ष असलेल्या ए.एन.एम.सौ.विद्या चंदेल-राजपूत
  • यांचे सर्वत्र कौतुक होत आहे,

विशेष म्हणजे ए.एन.एम. श्रीमती,विद्या चंदेल-राजपूत ह्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून त्यांना उच्चरक्तदाबाचा त्रास होत आहे असे असतांनाही आपल्या जीवाची पर्वा न करता वरिष्ठांच्या आदेशाला त्या तामील करत आहेत, उपकेंद्र बहादरपुरा ला इतर अकरा गावे जोडलेले असून त्या मधे बहादरपुरा, मानसपुरी,जंगमवाडी, कोटबाजार, नवरंगपुरा, लालवाडी, सुजानवाडी,गुलाबवाडी,
इमामवाडी, गुलाबवाडीतांडा व कंधार शहरालगतचे आसाननगर, शहाजीनगर, स्वप्नभुमी,हत्तीनाला हा शहरी भाग जोडण्यात आला आहे,त्यानुसार सौ. विद्या चंदेल-राजपूत यांनी दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळ पासून मौजे लालवाडी येथील नियमित असलेले लहान बालकांचे व गरोदरमातांचे लसीकरण केले ते करुन दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल केला व रात्री ८:३० वाजता उशिरापर्यंत कोटबाजार येथील कोवीड लसीकरण केले आहे, वरिष्ठांनी नेमूण दिलेले काम व फिल्डवरुन लसीकरण करून आल्यावरही त्यांनी रात्री ८:३० कोटबाजार येथे जाऊन कोवीड लसीकरण केले असून मागच्या महिन्यापासून दररोज एका गावात कोवीड चे लसीकरण त्या करत आहेत.
सौ.विद्या चंदेल-राजपूत यांची कोवीड कार्या विषयीची तळमळ पाहून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
कोटबाजार चे पोलीस पाटील महोम्मद काझिमोद्दिन यांना कोवीडची पहिली लस देवून कोटबाजार येथील कोवीड लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे,कोवीड लसीकरण मोहिमेची सुरवात म्हणून दोन लाभार्थ्यांना कोवीड लस देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यासाठी नावनोंदणी करण्यात येत आहे. या प्रसंगी सरपंच अझिमोद्दिन बबर महंमद साब,उपसरपंच शेखपाशाभाई, समुदाय अधिकारी डॉ. दीपाली गोरे,डॉ. भगवान वाघमारे,
डॉ. रोहणसिंह राजपूत,आरोग्य सहाय्यक मोहम्मद अली,कर्मचारी सैफ शेख,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *