नांदेड – प्रेस फोरम या पत्रकार संघटनेची महत्त्वाची बैठक आज पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष पदी दैनिक पुकार चे संपादक याहीया तर सचिवपदी दैनिक सुराज्य चे सुनील कांबळे यांची निवड करण्यात आली.
प्रेस फोरम या पत्रकार संघटनेची महत्त्वाची बैठक संस्थापक विजय निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय संघटक श्याम कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी नांदेड जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये अध्यक्ष शेख याहीया उपाध्यक्ष कुवरचद मांडले, जय भीम पाटील, लक्ष्मण शेट्टीवार सचिव सुनील कांबळे सहसचिव हैदर अली तर सदस्य म्हणून कुलदीप सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली समितीचे अन्य पदे व शहर कार्यकारणी लवकरच निवड करण्याचे ही यावेळी ठरले या बैठकीत प्रेस फोरम संघटनेने महानगरपालिकेच्या घरकुल योजनेतील घरकुलाची मागणी मान्य करून घेतली होती त्या मागणीचा पुढे पूर्तता करण्याचे ठरले.