मुखेड ;प्रतिनिधी
वर्ताळा ता. मुखेड येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा सेवानिवृत्त सेक्रेटरी, आनंदराव लक्ष्मणराव डावकरे यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दि.२४ एप्रिल २०२१ रोज शनिवारसायंकाळी ७.०० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, नातू असा परिवार आहे. माध्यमिक आश्रम शाळा, कमळेवाडी येथील सहशिक्षक लक्ष्मण डावकरे (बाळू), वन अधिकारी गजानन डावकरे यांचे ते वडील होत.
आनंदराव मामा हे गावभर व परिसरात आनंदराव गुरुजी डावखरे या नावाने ओळखत असत. अत्यंत सुस्पष्ट वक्तव्य करणारी व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक होता. असा व्यक्ती काळाने हिरावून घेतल्यामुळे वर्ताळा गावावर शोककळा पसरली आहे डावकरे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना प्रदान करो अशी प्रार्थना करतो व भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
(प्रतिनिधी )
दादाराव आगलावे व परिवार
वर्ताळा ता.मुखेड