सौ.मनिषाताई व डाॅ.प्रा.पुरुषोत्तमजी यांना १३ व्या विवाह वाढदिवसाच्या १३ ओळीच्या काव्य सौभाग्य सदिच्छा….!

मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठाण कंधारचे सचिव व छ.शंभुराजे इंग्लिश स्कूल वीर नागोजी नाईक चौक कंधार हे ज्ञानालय नावारुपास आणनारे आणि श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी कंधारचे सन्माननिय अध्यक्ष,माजी जि.प.सदस्य भाई डाॅ.प्रा.पुरुषोत्तमजी धोंडगे व त्यांच्या अधिश्वरी सौ.मनिषा पुरुषोत्तमजी धोंडगे या उभयतांच्या विवाहास दि.३० एप्रिल २०२१ रोजी तेरा पुर्ण झाले. सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारी यांनी १३ काव्याच्या ओळी रचीत,त्यांच्या वैवाहिक जीवनरंभी क्षण वाढदिवसाच्या मनापासुन सौभाग्य सदिच्छा व मानाची कोटि-कोटि जयक्रांति!


दोघांच्या शरीरातील ह्रदयालये,
विभक्त पण ह्रदय मात्र एक!
पुरुषोत्तमाची उत्तमच मनिषा,
चि.विक्रमादित्य,राजनंदनी लेक!
मुक्ताईसुत अन् सौ.चंद्रप्रभावती,
व्दयांचा समर्थ आशीर्वाद नेक!
रोहिदास चव्हाण यांची आशा,
राहावे आनंदात जावाई-लेक!
विवाह वाढदिवसा निमित्त्याने,
सौभाग्याच्या सदिच्छा देतांना,
दीर्घायुरारोग्यास कापतो केक!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारी,
शब्द सदिच्छा देते अनेकानेक!


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *