निवडणुकीच्या रणधुमाळीत,
पुढारी बगळा बनून फिरतो!
मतदार राजांच्या मतदानावर,
स्वतःचे उखळ पांढरे करतो!
कोरोनाकाळी मतदार संकटात,
नेता मात्र लाॅकडाउन राहतो!
जनतेचा लोकप्रतिनिधीं म्हणून,
विधीसभेत खुर्चीवर विराजतो!
कार्यकर्त्यांना तर हातचे बाहूले,
बनवून आम जनतेस छळतो!
पाच वर्षाला श्वानाच्या छत्रीगत,
निवडणुकीत पुन्हा उभे राहतो!
कोरोना टेस्ट असो वा लसीकरण,
मतदार राजास रांगेत पाहतो!
दीन बाधीत होताच बेडसाठी,
भेदरलेल्या आवस्थेत फिरतो!
श्रीमंत संक्रमीत होताच मात्र,
आधीच बेड आरक्षित असतो!
महासंकटाची लाट ओसरताच,
म्हणतो मी दानवीर कर्ण होतो!
गोपाळसुत————–
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
९८६०८०९९३१