तेरवी कार्यक्रम रद्द करून हाळदा गाव निर्जंतुकीकरण करून, सॅनिटायझर,मास्क आणि डेटॉल साबण चे वाटप.. NSUI चे अभिजीत हाळदेकर यांचा स्तुत्य उपक्रम


नांदेड ; प्रतिनिधी


विद्यार्थी काँग्रेस NSUI सोशल मीडिया चे प्रदेशाध्यक्ष तथा युवा कार्यकर्ते अभिजीत कांबळे हाळदेकर यांनी आपले चुलते कै. दिगांबर खंडोजी कांबळे यांच्या स्मरणार्थ तेरवीचा कार्यक्रम रद्द करून अनावश्यक खर्च न करता आपल्या जन्मगावी हाळदा ता. कंधार येथे दि.एक मे रोजी संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करून गावातील वयोवृद्ध नागरिकांना सॅनिटायझर,मास्क आणि डेटॉल साबण चे वाटप सरपंच हणमंतराव गायकवाड,उपसरपंच साहेबराव शिंदे,पोलीस पाटील विलासराव बुरपल्ले, लोकस्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दादा पवार, लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड,ज्ञानेश्वर डोंगरे,बालाजी कोकरे,सुरेश भाग्यवंत आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

अभिजीत कांबळे हाळदेकर हे सामाजिक बांधिलकी जपणारे युवा कार्यकर्ते असून आज पर्यंत त्यांनी असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी हाळदा येथील वयोवृद्ध नागरिकांना ब्लँकेटचे वाटप केले होते.त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुकही केले होते.
अभिजीत कांबळे हे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा साहित्यिक शिवा कांबळे यांचे चिरंजीव असून शिवा कांबळे यांनीही आपल्या वडिलांच्या तेरवी कार्यक्रमात साठ अनाथ मुलांना गणवेशाचे वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तोच वसा आणि वारसा घेऊन अभिजीत कांबळे हाळदेकर यांनी आपल्या चुलत्याचा तेरवी कार्यक्रम रद्द करून अनावश्यक खर्च न करता वरील उपक्रमाचे आयोजन केले होते.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे हाळदा
येथील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबाराराव पाटील शिंदे, जितेंद्र मंदावाड, गोविंद वाघमारे, कमलकिशोर बुरपल्ले, दामोदर पुसदेकर, सुभाष रामरूपे, चंदू अजिलवाड, बळीराम यलमिटवाड, उत्तम पटलेवाड, गौतम सूर्यवंशी, भुजंग सूर्यवंशी, साहेबराव बैलके, खंडू कवडीकर, दत्ता वाघमारे,सटवाजी कांबळे,रामकिशन जाधव,धोंडोपंत कांबळे, नामदेव कांबळे,शिवा कांबळे, आनंदा कांबळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *