माजी प्राचार्य समाजभूषण जे.एस. तोटरे यांचे निधन

मुखेड ; प्रतिनिधी


शाहीर अण्णा भाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय,मुखेड येथील माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक ‘अनुभवाची शिदोरी’ या महत्वपूर्ण आत्मकथनाचे लेखक
तथा महाराष्ट्र शासनाच्या दलितमित्र पुरस्काराचे मानकरी तथा राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक, राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक विचार मंचाचे आमचे मार्गदर्शक एक कर्मयोगी व्यक्तिमत्व आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या उत्थानासाठी, प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी तसेच विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी अविरत परिश्रम घेणारे समाजभूषण जे.एस. तोटरे सरांचे दि.३ मे रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
त्यांचा पार्थिवावर आज सोमवार दिनांक ०३ मे २०२१ रोजी सायंकाळी नऊ वाजता टोलनाका मुखेड येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *