नांदेड ;प्रतिनिधी
तिसऱ्याला लॉकडाउनच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत शंभर टक्के लोकसहभागातून काळात सतत एकोणविसाव्या दिवशी चारशे लॉयन्सच्या डब्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
सोमवारी अन्नदान केलेल्या मध्ये नांदेड येथील प्रसिद्ध व्यापारी बनारसीदास भैय्याजी अग्रवाल यांचे नातू युनय हर्ष अग्रवाल यांच्या वाढदिवसा निमित्त १००डबे,सौ.रेवती व अनुदत्त रायकंठवार बिलोली यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ५१ डबे वितरित करण्यात आले.प्रत्येकी ५० डबे देणाऱ्यांमध्ये
कै. कुमारी सिद्धी श्याम अग्रवाल तेलहारा यांच्या स्मरणार्थ लॉ.संजय अग्रवाल ,चंद्रकांत नागोराव जोशी,आनंद यडपलवार सर,
जारीकोट ता.धर्माबाद,किशन नारायण देवराज ,वसंतराव अहिरे यांच्या समावेश आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथील प्रवासी, रस्त्यावरील निराधार तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी यांना दररोज डबे दिले जातात. लॉक डाउन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू असणार असल्यामुळे आणखी सतराशे डब्यांची आवश्यकता असून अन्नदात्यांनी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, प्रोजेक्टर चेअरमन
लॉ.अरुणकुमार काबरा यांच्यासह
लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे
अध्यक्ष लॉ. नागेश शेट्टी,सचिव
लॉ.धनराजसिंह ठाकूर,कोषाध्यक्ष
लॉ. अनिल चिद्रावार,प्रोजेक्टर चेअरमन राजेशसिंह ठाकूर , मन्मथ स्वामी यांच्यापैकी कोणालाही संपर्क साधावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.