भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र तर्फे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया विभाग प्रमुख विश्र्वजा गोखले यांना व्हर्चुअल श्रद्धांजली अर्पण ; प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची माहिती

नांदेड ; प्रतिनिधी

भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र
प्रदेश अध्यक्ष मा. उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया विभाग प्रमुख विश्र्वजा गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज दि.३ मे रोजी व्हर्चुअल शोकसभेचे आयोजन करण्यात आले अशी माहीती उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी दिली.

सभेला मा. उमाताई खापरे, सोशल मीडिया राष्ट्रीय संयोजिका प्रीतिजी गांधी, महाराष्ट्र संयोजिका डॉ नयना वसानी यांनी आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. सभेचं संचालन श्रद्धांजली अर्पण करून उपाध्यक्षा मा. प्रणिताताई चिखलीकर यांनी केले.

सभेस सर्व माननीय प्रदेश पदाधिकारी , विश्र्वजा गोखले यांचे जवळचे नातेवाईक ,सर्व प्रदेश सह संयोजिका, जिल्हा संयोजिका यांनी उपस्थित राहून दोन मिनिट मौन राहून श्रद्धांजली वाहिली. सर्व सोशल मीडिया संयोजिका भगिंनिंच्या भावनांना व्यक्त करण्याची संधी देऊन मा. प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांनी सर्वांचे सांत्वन केल्या बद्दल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *