बोरी (बु ) येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पिळवणूक होत असल्याची ग्रामस्थांची तहसीलदाराकडे तक्रार

फुलवळ ;( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील बोरी (बु ) येथील स्वस्त धान्य दुकानदार किशन मारोती मुळे यांच्याकडून गेली चार वर्षांपासून गावकऱ्यांची पिळवणूक होत असून जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याची लेखी तक्रार बोरी ( बु ) येथील गावकऱ्यांनी ता. ३ मे रोजी तहसीलदार कंधार यांच्याकडे केली असून त्या तक्रारी निवेदनावर जवळपास २५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गावकऱ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनात असा उल्लेख करण्यात आला आहे की , निवेदनकर्ते आम्ही बोरी (बु ) येथील रहिवासी असून येथील स्वस्त धान्य दुकानदार किशन मुळे हे मागील चार वर्षांपासून गावकऱ्यांना रेशन दुकान चा माल वाटप करताना आम्ही घेतलेल्या मालाची रीतसर पावती न देता जास्तीचे पैसे घेत असून गावकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. आणि खरेदी केलेल्या मालाची पावती ग्रामस्थांनी मागितली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. एवढेच नाही तर दुकान समोर भाव फलक ही लावलेला नाही तो पण तात्काळ लावण्यास भाग पाडावे असाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

संबंधित अधिकारी यांनी तात्काळ आमच्या निवेदनाचा विचार करून गावकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवावी अशी विनंती ही गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर गुरुनाथ वाघमारे , रोहिदास फड , माधव व्यवहारे , बालाजी वडजे, माधव वडजे , बाबू मठपती , इतिहास कुलकर्णी , प्रल्हाद मठपती , साईनाथ फड , माधव सांगवे , चांदू गायकवाड , माधव बेंद्रे , पंढरी व्यवहारे ,दिलीप सांगवे , मन्मथ मठपती , संभाजी फड , मारोती वाघमारे , दत्ता वाघमारे , मधुकर वाघमारे , नंदाबाई व्यवहारे , गोविंद बोरकर , हरी गंगावणे , तुळशीदास व्यवहारे , मारोती जुंबाड , गणेश बोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *