कोरोना काळात मदतीचा हात ; जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा;मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

लोहा प्रतिनिधी / शैलेश ढेबंरे

लोहा : राज्यात सर्वत्र कोरोनाने शिरकाव केला आहे.या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

दरवर्षी मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी सध्याची कोवीडची परीस्थिती पाहता त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. पुष्पगुच्छ , पुष्षहार , हारे तुरे न घेता सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी वाढदिवसानिमित्त वैद्यकीय सेवेत काम करणारे कर्मचारी यांचा सम्मान केला.

लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी डाॅक्टर , नर्स , परीचारीका , सेवक यांना मास्क , सॅनीटायझर , हाॅडक्लोजचे वाटप केले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव , माजी जिल्हा परिषद सदस्य पुरूषोत्तम भाऊ धोंडगे , छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊल पाटील पवार , संयोजक प्रसाद पोले , गोविंद पवार सायाळकर , विजय पाटील पवार पांडुरंग लोंढे सर आदिची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *