धर्मापुरी ( प्रतिनिधी ) येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 11 एप्रिल 25 रोजी सकाळी ठीक 11 00 वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ कोकणे जे पी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आदींसह फुले – शाहू – आंबेडकर यांनी भारतीय समाजातील वाईट रुढी आणि परंपरा यावर बोट ठेवले. असं प्रतिपादन प्रा डॉ कोकणे जे पी यांनी केले. आज अगदी उच्च शिक्षणाची सुविधा जागोजागी झाली आहे. हा भाग वेगळा. त्याबाबत आपण सारे खरंच खूप सुखी आहेत. असा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन प्रा भगवान आमलापुरे यांनी केले. या अभिवादन कार्यक्रमानंतर लगेचच प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने पुष्पगुच्छ आणि शाल देऊन उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.