नांदेड दि. 11 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहमध्ये क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांची जयंती येथील सामाजिक न्याय विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात आज उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रामाचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची उपस्थिती होती.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी अऊलवार यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंती निमित्त मार्गदर्शन करुन उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त महामानवांना अभिवादन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले जयंती निमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होत. क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जीवन चरित्रावर समाज भुषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे यांनी प्रकाश टाकला व उपस्थितांना सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुजाता पोहरे, कैलास मोरे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पंडीत, कार्यालय अधीक्षक डी. वाय. पतंगे, सहाय्यक लेखाधिकारी उपस्थित होते. संविधानाचे सामुहिक वाचन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पापंटवार यांनी केले तर आभार श्रीमती अंजली नरवाडे यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
00000