लातूर;
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गंभीर रुग्णांसाठी जीवनदायिनी अशी ओळख असलेले ४५ व्हेंटिलेटर्स खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रयत्नातून आरोग्य विभागास प्राप्त झाले असून ते रुग्णसेवेत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.परंतु कोरोना महासंकटातही खासदार सुधाकर श्रृगारे यांनी कंधारलोहा या आपला लोकसभा मतदार संघाला वा-यावर सोडले आहे.
लातूर येथील शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी खा. सुधाकर श्रृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. खा. सुधाकर श्रृंगारे यांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने लातूर जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत, त्यापैकी ४५ व्हेंटिलेटर रुग्णांच्या सेवेत सद्यस्थितीत उपलब्ध झाले आहेत.उर्वरीत १५ व्हेंटिलेटर्स लवकरात लवकर जिल्ह्याला मिळणार आहेत.लातूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरची कमतरता असल्यामुळे अतिगंभीर लक्षणे असणार्या कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य विभागासमोर मोठ्या आडचणी होत्या.खा.सुधाकर श्रृंगारे यांनी लातूर जिल्ह्यात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याची बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन,केंद्रीय आरोग्य राज्यमंञी आश्विनीकुमार चोबे आणि संबंधित विभागाकडे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत अनेकदा पञाव्दारे पाठपुरावा केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारकडून लातूर जिल्ह्यासाठी ४५ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत.कोरोनाच्या पार्शभूमीवर लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागात व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याची सुखदायक घटना असून लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण लवकर बरे व्हावेत, कोरोनाचा संसर्ग लवकर आटोक्यात यावा व भविष्यात ज्या ज्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासेल तेव्हा तेव्हा त्यांना व्हेंटिलेटर सहज उपलब्ध व्हावेत तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खा.सुधाकर श्रृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,संसदीय कामकाज मंञी अर्जुन मेघवाल,प्रल्हाद जोशी,जी किशन रेड्डी यांच्याशी व्हिडीओ काँन्फ्रेन्सव्दारे संवाद साधला होता.शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ते आजही पाठपुरावा करीत आहेत.अखेर त्याकामी यश आले असून लातूर जिल्ह्यासाठी ६० व्हेंटिलेटरची मागणी केली होती. त्यापैकी ४५ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत ते सध्या रूग्णांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात येणार आहेत.लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयास २०, उदगीर उपजिल्हा रुग्णालयास १५ तर निलंगा उपजिल्हा रुग्णालयास १० असे एकूण ४५ व्हेंटिलेटर लातूर जिल्हासाठी उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ ढगे यांनी दिली.उर्वरित १५ व्हेंटीलेटर लवकरात लवकर लातूर जिल्ह्याला मिळतील असे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी सांगितले आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.