कंधार ; (युगसाक्षी )
नांदेड जिल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना माननारा मोठा वर्ग जिल्यात ग्रामीण भागात आहे.खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा नुकताच कोरोना अहवाल पॉझेटीव्ह आला आहे.त्यामुळे ते उपचार घेण्यासाठी रुग्णालयात असून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर कोरोनातून लवकरात लवकर सावरण्यासाठी काटकळंबा ता.कंधार येथिल कार्यक्रत्यानी रेणुकामातेला साकडेघातले आहे.
नांदेड जिल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोणा रोगांची लक्षणे आढळुन आले आहे ते संभाजीनगर येथे उपचार घेत आहेत म्हणून काटकळंबा येथील त्यांचे चाहते कार्यकर्ते यांनी काटकळंबा गावचे कुलदैवत श्री.रेणुकामाता चरणी आरती व प्रार्थना करून आमच्या साहेबांचा कोरोणा लवकरात लवकर कमी होऊ दे ते पुन्हा जनसेवेसाठी लवकर येऊ दे व भारतातुन,राज्यातुन,जिल्हातुन,तालुक्यातुन कोरोणामुक्त होऊ दे पुन्हा सर्व जनजीवन सुरळीत होऊ दे अशी आई रेणुका माता चरणी प्रार्थना सर्व कार्यकर्त्यांनी केली