फुलवळ ; धोंडीबा बोरगावे
फुलवळ गावापासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर आज ता. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास क्रूजर गाडी क्र. एम एच २५ आर १२२९ या गाडीचा जबर अपघात झाला असून सुदैवाने जातीत हानी मात्र टळली . परंतु दोघांना किरकोळ मार लागल्यामुळे खाजगी वाहनाने त्या जखमींना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सदर गाडी ही फुलवळ वरून कंधारकडे जात असताना फुलवळ बस स्थानकापासून काही अंतरावरच चालकाचा गाडीवरील ताबा अचानक सुटल्याने चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर अचानक स्वतःची साईड सोडून पलटी होऊन दुसऱ्या साईड ला सिमेंट रस्त्यावर घासत जाऊन पुन्हा तोंड फिरवून पहिल्याच बाजूच्या रस्त्यावर येऊन आदळली . त्यातच काहीजण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले.
बातमी पूर्ण होईपर्यंत कसलाच गुन्हा दाखल झाला नव्हता.
सध्या चालू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम हे संथगतीने चालू असून , पावसाळ्यामुळे वाहनांना सदर रस्त्यावरून वाहने चालवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असून जीव मुठीत घेऊन प्रवाशी ही नाविलाजास्तव प्रवास करत आहेत.
सदर कामाच्या ठेकेदाराची ही हलगर्जी अशीच चालू राहिली तर येणाऱ्या काळात असेच अपघात होतील आणि कित्येकांना जीव गमवावा लागेल आणि याला नेमके कोण जबाबदार असेल ? असा प्रश्न निर्माण होतो आहे.