कंधार ; हानमंत मुसळे
कंधार शहरातील शिवाजी नगरात यावर्षी जन्माष्टमी साजरी करतांना दोन चिमुकले कृष्णाची वेशभुषा कुमार समर्थ स्वाती ज्ञानेश्वर कागणे याने हुबेहुब श्री कृष्णाची वेशभुषा साकारुन गोकुळातील यशोदेचा नंदलाल जिवंत साकारला तर गोकुळाची गवळणची वेशभुषा कु.कृष्णप्रिया संगीता मारोती गीते हीने कृष्णाची सखी राधा जिवंत साकारली.
हे दोघेही शाळेचा श्रीगणेशा सुध्दा केला नाही.कृष्णाचे वय तीन वर्ष तर राधेचे वय दोन वर्ष या राधाकृष्णाच्या जोडीने जन्माष्टमीचा आनंद व्दिगुणित केला.हाथी घोडा पालखी। जय कन्हया लाल की॥ या उघ्दोषणेने शिवाजी नगरचे वातावरण राधा-कृष्णाच्या जोडीने भक्तीमय झाले.छायाचित्रे योगगुरु नीळकंठ मोरे यांनी केले तर सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांनी सदरील कार्यक्रम घडवून आणला.