कंधारी आग्याबोंड दि. १८ \५\२०२१ मानवा तू लॉकडाउन राहिल्याने,
कोरोना संसर्ग टाळू शकतोस! आम्ही खुराड्यात लपलो तरीही, आमच्या मानेवर सूरी फिरवतोस! रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे, निमित्तच हव्यासापोटी करतोस! तुमच्यासाठीच कोरोना घातक, आम्हास तूच कोरोना दिसतोस? तुझा काय माझा काय तो जीवच, खुर्रमुंडी तर आमची तू करतोस! आम्हास बोलता येत नाही पण, असंवेदनशील मानव भासतोस ! निसर्गा पेक्षा मानवा तुझी हवस, पुर्ण करून आम्हाला संपवतोस! तूच सांग कोरोना विषाणु घातक ? आम्हासाठी तुच यमराज ठरतोस?
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा